अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला !

सामाजिक माध्यमांतून मागणी

मुंबई – अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा ‘लालसिंग चढ्ढा’ हा नवा चित्रपट ११ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होत आहे, त्या आधीच त्यावर बंदी घालण्याची किंवा त्या बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ट्विटरवर ‘#BoycottLaalSinghCaddha’ हा ‘ट्रेंड’ चालवण्यात आला.

विरोधामागील कारण

या चित्रपटाविषयी लोकांमध्ये अप्रसन्नता असण्यामागे आमीर खान आणि करीना कपूर यांनी केलेली जुनी वक्तव्ये कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ‘आमचे चित्रपट पाहू नका, कुणीही बळजोरी करत नाही’, असे करीना कपूर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. याविषयी सामाजिक माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

१. एका वापरकर्त्याने म्हटले की, तुमच्या (आमीर खान यांच्या) पत्नीने सांगितले, ‘भारतात रहाणे सुरक्षित नाही.’ मग तुम्ही तुमचा चित्रपट येथे का प्रदर्शित करत आहात ?

२. दुसर्‍या एका वापरकर्त्याने म्हटले की, मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटावर कष्टाचे पैसे व्यय (खर्च) करू नयेत. काही वर्षांपूर्वी आमिर खान यांनी ‘शिवलिंगावर दूध अर्पण करणे व्यर्थ आहे’, असे विधान केले होते.

३. काही लोकांचे म्हणणे आहे की ‘लालसिंग चढ्ढा’ पहाण्यापेक्षा ‘फॉरेस्ट गंप’ हा मूळ चित्रपट पहाणे चांगले आहे.