पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात निपाणी (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांकडून घंटानाद आंदोलन !

निपाणी (कर्नाटक), ३० जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड आणि विशाळगड येथे पडझड चालू असून पुरातत्व विभाग त्या संदर्भात कोणतीच कृती करत नाही. पुरातत्व विभागाच्या या निष्क्रीयतेच्या विरोधात निपाणी (कर्नाटक) येथे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुत्वनिष्ठांकडून बसस्थानक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मावळा ग्रुपचे अध्यक्ष श्री. आकाश माने, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, सर्वश्री प्रभाकर थोरात, राजू कोपार्डे, सागर श्रीखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांसह अन्य उपस्थित होते. या आंदोलनात शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.