देहलीत ऑनलाईन मागवले गेले बंदी असलेले ५० सहस्रांहून अधिक चायनीज चाकू !

  • देहली पोलिसांनी ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘मीशो’ यांच्याकडून मागवली खरेदीदारांची सूची !

  • पोलीस घेत आहेत वसीम आणि नदीम यांचा शोध !

नवी देहली – नवी देहलीत ५० सहस्रांहून अधिक चायनीज चाकू ऑनलाईन खरेदी आणि विक्री करण्यात आल्याची माहिती देहली पोलिसांनी उघड केली. या बंदी असलेल्या चाकूंच्या प्रकरणी पोलीस २ आरोपींचा शोध घेत आहेत. यासह पोलिसांनी ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘मीशो’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या संकेतस्थळांना नोटिसा बजावून त्यांना चाकू विकत घेतलेल्या सर्व लोकांची संपूर्ण माहिती मागितली आहे.

१. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये अशा चाकूंचा वापर करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देहली पोलिसांनी सांगितले. देहलीमध्ये चाकू बाळगण्यास बंदी असून तो बाळगणे, हे शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत येते.

२. काही दिवसांपूर्वी देहली पोलिसांना एक बेवारस बॅग सापडली होती. ही बॅग कुरिअर पोचवणार्‍या व्यक्ती गाडीतून पडली होती. बॅग उघडली असता त्यात मोठ्या प्रमाणात चायनीज चाकू आढळून आले. प्राथमिक तपासात गुजरात येथून वसीम आणि भाग्यनगर येथून नदीम यांनी चाकूची मागणी केली होती, असे निष्पन्न झाले. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

३. देहली पोलिसांनी अलीकडेच बटन असलेले १४ सहस्र ५०० चाकू जप्त केले आहेत. हे चाकू चीनमधून आयात करण्यात आले होते. ते फ्लिपकार्ट आणि मीशो अ‍ॅपवर ऑनलाईन विकले जात होते. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात चाकू खरेदी करण्यामागील हेतू काय आहे ?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

सध्या देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्‍या शिरच्छेदाच्या पार्श्‍वभूमीवर याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. देहलीप्रमाणेच संपूर्ण देशात अशा प्रकारची खरेदी कशासाठी केली गेली ? याचाही पोलिसांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे !