बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे करणे चालूच आहे. बांगलादेशातील नरेल येथे मुसलमानांकडून हिंदूंवर पुन्हा आक्रमणे झाली आहेत. त्यांची घरे, मंदिरे आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. याविषयी जग गप्प का आहे ? हिंदूंवरील इस्लामी हिंसाचार त्यांना मान्य आहे का ? हिंदूंवर भारतात किंवा बांगलादेशातच नव्हे, तर कुठेही अत्याचार होऊ नयेत, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले.  बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. गेल्या काही कालावधीपासून विल्डर्स भारतातील हिंदूंच्या रक्षणार्थ विविध ट्वीट्स करून जनजागृती करत आहेत. जागतिक समुदायाकडून त्यांच्याकडे ‘इस्लामचे कट्टर विरोधक’ म्हणून पाहिले जाते.

हिंदूंनो, स्वसंरक्षणासाठी लढण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार !

दुसर्‍या एका ट्वीटमध्ये गीर्ट विल्डर्स यांनी हिंदूंना आवाहन केले आहे की, भारतातील हिंदूंनो, तुम्ही स्वत:साठी, स्वसंरक्षणासाठी, तुमची मूल्ये आणि संस्कृती यांसाठी आणि नूपुर शर्मा यांच्यासाठी लढले पाहिजे. तुम्हाला तसे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुम्ही इस्लाम, सांस्कृतिक सापेक्षतावाद, भ्रष्टाचारी न्यायाधीश आणि दुबळे राजकारणी यांच्या आहारी गेलात, तर तुम्ही सर्वकाही हरवून बसाल ! निर्भयी व्हा ! मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचे समर्थन करतो.

संपादकीय भूमिका

असा प्रश्‍न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !