लातूर येथे हिंदु युवतीचे धर्मांतर करून बलात्कार !

अराफत खानसह त्याच्या कुटुंबातील ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर – येथील २७ वर्षीय युवतीचे धर्मांतर करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अराफत खानसह त्याच्या कुटुंबातील ८ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे बलात्कार, तसेच ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याचे आणखी एक उदाहरण ! धर्माचरण आणि धर्मशिक्षण यांमुळेच हिंदूंचे रक्षण होऊ शकते, हे लक्षात घ्या ! – संपादक)

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

१. शहरातील खान ‘कॉम्प्लेक्स’मध्ये पीडित युवतीचे दुकान होते. याच ‘कॉम्प्लेक्स’मध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी अराफत लाईक खान याचेही दुकान होते. अराफत खानने पीडित युवतीशी जवळीक साधून ऑक्टोबर २०१८ मध्ये विवाहाची मागणी करून तिला मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. यासंदर्भात तिच्यासमवेत एका ‘बाँड पेपर’वर करार करण्यात आला.

२. १ डिसेंबर २०१९ या दिवशी ‘विवाह करायचा आहे’, असे सांगून एका मौलानाकडून पीडित युवतीला नमाज, कुराण आणि कलमा वाचण्याचे शिक्षण दिले. त्यानंतर तिला न्यायालयात नेऊन मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडले.

३. मुसलमान धर्म स्वीकारल्यानंतर आरोपीने पीडित युवतीस घर घेऊन दिले आणि तिथे तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. कालांतराने आरोपीने तिच्याशी विवाह करण्याऐवजी दुसर्‍याच मुलीशी विवाह जुळवला. ही माहिती मिळताच पीडित युवती अराफत खान याच्या घरी जाब विचारण्यास गेली असता अराफत आणि त्याच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

संपादकीय भूमिका

हिंदु मुलींशी जवळीक करण्यामागे धर्मांधांचा हेतू कधीच शुद्ध नसतो, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध होत आहे. हिंदु युवतींनो, धर्मांधांशी जवळीक साधणे धोकादायक आहे, हे लक्षात घ्या आणि त्यांच्यापासून दूर रहा !