आळंदी (जिल्हा पुणे) – देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहस्रो भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक आणि दुधारती झाल्यानंतर भाविकांना दर्शन रांगेतून माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभार्यामध्ये प्रवेश देण्यात आला.