पलवल (हरियाणा) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पलवल (हरियाणा) – येथे अंजूम या मुसलमान तरुणाने विकी भारद्वाज नावाच्या तरुणाच्या पोटावर चाकूचे वार केले. विकी याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना २८ जून या दिवशी घडली. अंजूम याच्यासह अन्य ५ आरोपी या आक्रमणात सहभागी होते, असे समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या आक्रमणामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. विकी देहलीहून परतत असतांना बस स्थानकाजवळ एका चारचाकी गाडीतून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदूंच्या संघटनांनी पलवलमध्ये ३० जून या दिवशी निदर्शने केली. या निदर्शनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

संपादकीय भूमिका

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी आक्रमणे होणे, हिंदूंना अपेक्षित नाही. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !