मुंबई – येथील अरबी समुद्रात ओ.एन्.जी.सी.च्या ‘सागर किरण’ या तळावर ओएन्जीसीचे हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आले. २ वैमानिक आणि ७ प्रवासी हेलिकॉप्टरमध्ये होते. बचावकार्यासाठी जहाज पाठवण्यात आले. ओ.एन्.जी.सी.नेही त्यांचे बचाव पथक पाठवून प्रवाशांची सुटका केली. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांवर उपचार चालू आहेत.