वर्ष २००२ मधील गुजरात दंगल हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील षड्यंत्र ! – गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – वर्ष २००२ मधील गोध्रा हत्याकांडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या गुजरातमधील दंगलींसंदर्भात विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांनी भाजपच्या विरोधात अपप्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले होते; परंतु शेवटी सत्य समोर आले. दंगलींचा राजकीय उपयोग करणे अयोग्य आहे. गोध्रामध्ये जिवंत जाळण्यात आलेल्या कारसेवकांवर काँग्रेसने साधलेल्या मौनावरही शहा यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

शहा पुढे म्हणाले की,

१. गोध्रामध्ये एका १६ वर्षीय मुलीला जाळण्यात आले. मी स्वत: तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

२. सर्व ५९ कारसेवकांच्या अंत्यसंस्काराला मी स्वत: उपस्थित होतो.

३. गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्या वेळी काम करणार्‍या अधिकार्‍यांनी चांगले काम केले होते.

४. आम्ही वस्तू आणि सेवा कर, सर्जिकल स्ट्राईक यांसारखी अनेक युद्ध लढलो. पंतप्रधानांच्या विरोधात षड्यंत्र रचणारे पराजित झाले.