‘साधना शिबिर’ यासारख्या समष्टी सेवेमध्ये वाईट शक्ती सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण न करता एकाच प्रकारे समष्टी आक्रमण करून कशा प्रकारे स्वतःची शक्ती वाचवतात, हे लक्षात येणे

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

‘२०.६.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील एका संतांचा कान पुष्कळ दुखत होता. दुपारी २ वाजता मला त्यांच्यासाठी नामजपादी उपाय शोधून त्यांच्यासाठी उपाय करायला सांगण्यात आले. मी उपाय शोधले असता मला ‘एका हाताचा तळवा सहस्रारावर आणि दुसऱ्या हाताचा तळवा विशुद्धचक्रावर ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप १ घंटा करणे’, हा उपाय मिळाला. मी हा उपाय करायला आरंभ करणार तोच मला निरोप मिळाला, ‘आजपासून आरंभ झालेल्या ‘साधना शिबिरात’ साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या संतांचे सहस्रार आणि विशुद्धचक्र यांवर दाब जाणवत असून तुम्ही त्यासाठी उपाय करा.’ मला आश्चर्य वाटले; कारण मी एका संतांसाठी शोधलेला उपाय आणि ‘साधना शिबिरात’ मार्गदर्शनासाठी उपस्थित संतांसाठीचा उपाय एकच होता.

यावरून लक्षात आले, ‘वाईट शक्तींनी शिबिरात उपस्थित असलेल्या सर्व संतांना त्रास देण्यासाठी सर्वांवर एकसारखेच आक्रमण केले होते, तसेच वाईट शक्ती एका संतांनाही त्याच प्रकारे त्रास देत होत्या. सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण न करता एकाच प्रकारे समष्टी आक्रमण करून वाईट शक्ती अशा प्रकारे स्वतःची शक्ती वाचवतात. त्यामुळे मला सर्व संतांसाठी उपाय करण्यासाठी कुंडलिनीचक्रांची स्थाने एकच आली. माझाही वेळ वाचला. मला शिबिरातील संत आणि आश्रमातील एक संत यांच्यासाठी एकाच वेळी नामजपादी उपाय करता आले. मी हे उपाय दीड घंटा केल्यावर सर्वांचे त्रास दूर झाले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.६.२०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक