‘नरेंद्र मोदी यांनी मुसलमान व्हावे, आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ !’

मौलाना तौफीर रझा खान यांचे फुकाचे आवाहन

बरेली (उत्तरप्रदेश) – लोक आमची घरवापसी करू इच्छित आहेत. आम्ही म्हणतो, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी यावे अन् मुसलमान व्हावे. आम्ही त्यांना डोक्यावर बसवू, असे आवाहन ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काऊन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी येथे आयोजित सभेत केले. नूपुर शर्मा यांच्या विरोधात ही सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी नूपुर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी या सभेला केवळ दीड सहस्र लोकांना उपस्थित रहाण्याची अनुमती दिली होती; मात्र सहस्रावधी मुसलमान या वेळी उपस्थित होते. (असे कृत्य हिंदूंकडून झाले असते, तर पोलिसांनी कारवाई केली असती; मात्र आता पोलीस कारवाई  का करत नाहीत ?, असे हिंदूंनी विचारले पाहिजे ! – संपादक)

१. मौलाना तौफीर रझा खान त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, आम्ही अल्लाच्या व्यतिरिक्त कुणालाच घाबरत नाही. आम्ही सरकारला नाही, तर संयुक्त राष्ट्रांना नूपुर शर्माविरोधात निवेदन देणार आहोत. केवळ इस्लामच जगात शांतता निर्माण करू शकतो; कारण इस्लाममध्ये कुणीही लहान किंवा मोठा नसतो. (जगात कुणामुळे अशांतता निर्माण झाली आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे अशी विधाने किती हास्यास्पद आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)  

२. ‘अग्नीपथ’ योजनेवर टीका करतांना मौलाना खान म्हणाले की, जेव्हा या योजनेचे नावच असे असेल, तर देशात आग लागणारच. मोदी सरकारने या योजनेद्वारे तरुणांना नष्ट करण्याचा ठेका घेतला आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांचे धार्मिक नेते हिंदूंचे धर्मांतर करण्याच्याच विचारात असतात किंवा हिंदूंवर आक्रमण करण्याची चिथावणी देत असतात, हेच यातून लक्षात येते ! अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !