अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वरळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची विक्री करणारा अहमद शेख याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता सर्व कुटुंबच या व्यवसायात असल्याचे उघड झाले. शेख हा माहीमचा रहिवासी असून त्याच्याकडून १७ लाख २५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. पोलिसांनी सांगितले की, अधिक पडताळणीत आरोपीचा मुलगा जावेद याला वर्ष २०१७ मध्ये १ किलो १५० ग्रॅम चरससह अटक केली होती. त्याची मुलगी नजमा हिलाही वर्ष २०२१ मध्ये १०० ग्रॅम एम्डी आणि २ किलो ७०० ग्रॅम चरससह अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

धर्माधांना कायद्याचा धाकच उरलेला नाही, हेच यावरून दिसून येते !