VIDEO : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचा वैध मार्गाने प्रतिकार’ या विषयावर उहापोह !

नक्षलवादाच्या आडून हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

डावीकडून श्री. गोपी के., श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा आणि अधिवक्ता (सौ.) रचना नायडू

नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी देशातील सैनिक सक्षम आहेत; परंतु चकमकीमध्ये नक्षलवाद्यांना मारण्यात येते, तेव्हा काही मानवतावादी मंडळी नक्षलवाद्यांच्या बाजूने उभे रहातात. नक्षलवादी लहान मुलांना मारतात, तेव्हा ही मानवतावादी मंडळी पुढे येत नाहीत. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, राष्ट्रघातकी शेतकरी आंदोलनाचे समर्थन, कोरेगाव भीमा दंगलीतील शहरी नक्षलवाद्यांचे समर्थन, शाहीनबाग आंदोलनाचे समर्थन अशा यांच्या कारवायचा चालू आहेत. नक्षलवादी देशात अनेक समस्या असल्याचे भासवतात; परंतु सर्वाधिक हिंसक कारवाया नक्षलवादीच करतात. रस्ता बांधण्यासाठी आलेल्या गाड्या जाळून आदिवासींच्या सुविधेसाठी असलेला रस्ता होऊ देत नाहीत. सर्वाधिक वृक्ष नक्षलवादीच कापतात. आदिवासी भागांत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांकडून बाँम्बस्फोट केले जात आहेत. गावातील आदिवासींना निर्वासित करण्यात येते. आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत; परंतु आदिवासी भागांत प्राथमिक सुविधाही पोचलेल्या नाहीत. या नक्षलवाद्यांनी कधी चर्चवर आक्रमण केल्याची घटना आपण ऐकलेली नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून ‘तुम्ही पीडित आहात’, अशी भावना आदिवासी लोकांमध्ये निर्माण करण्यात आली. भारतीय संस्कृतीपासून त्यांना तोडण्यात आले. छत्तीसगडमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करून आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत आहे. जे आपल्याशी युद्धात जिंकले नाहीत, त्यांनी अशा प्रकारे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे, असे वक्तव्य छत्तीसगड येथील अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू यांनी केले. ‘नक्षलवादी, ख्रिस्ती आणि साम्यवादी यांची कुटील युती अन् छत्तीसगडमधील आदिवासी हिंदूंची स्थिती’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर बंगळुरू (कर्नाटक) येथील ‘विराट हिंदुस्‍थान संघम्’चे राज्य महासचिव श्री. गोपी के., ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल आणि सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा हे उपस्थित होते.

देशाच्या खर्‍या शत्रूंना ओळखून आपल्या भूमीचे रक्षण करणे आवश्यक ! – श्री. गोपी के., राज्‍य महासचिव, विराट हिंदुस्‍थान संघम्, बंगळुरू, कर्नाटक

श्री. गोपी के.

जगातील इतर पंथियांना स्‍वतःचे राष्‍ट्र आहे; मात्र हिंदूंना स्‍वतंत्र राष्‍ट्र नाही. पाकिस्‍तान भारताचे अनेक तुकडे करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी पाकिस्‍तानचे काही गट देशात कार्यरत आहेत. यात ते निपून आहेत. देशाच्या खर्‍या शत्रूंना ओळखून स्‍वतःच्‍या भूमीचे रक्षण करणे आवश्यक आहे. देशात काळ्‍या पैशाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. हे पैसे गुंतवणारे कोण आहेत ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांसह इतर पंथांतील लोकांना राजकीय साहाय्‍य मिळते. देशातील सर्व राज्‍यांत हिंदूंचे हित पहाणारे नेते निवडून आणण्‍यासाठी प्रयत्न करायला हवे.

देशाचे तुकडे करण्याची शहरी नक्षलवाद्यांची रणनिती यशस्वी होऊ देणार नाही ! – श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद, महाराष्ट्र  

श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल

‘‘देशात जिहादी मानसिकता असली, तरी त्याहून अधिक शहरी नक्षलवादी अतिशय धोकादायक आहेत. शहरी नक्षलवादी रणनिती आखून देशाचे तुकडे करण्याचे स्वप्न पहात असले, तरी त्यांची ही रणनिती यशस्वी होणार नाही’’, असा घणाघात ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केला. रामनाथी येथे चालू असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात ‘शहरी नक्षलवाद्यांची वास्तविकता’ या विषयावर ते बोलत होते.

श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल पुढे म्हणाले की,

१. मुंबई येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर आतंकवाद्यांचा सामना करण्यासाठी मी ‘लष्कर-ए-हिंद’ या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेद्वारेच मी आतंकवादी महंमद अफझल याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती.

२. जिहादी मानसिकता नष्ट करण्याचे काम माझी संघटना करते. शत्रूला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मी माझ्या संघटनेचे नाव ‘उर्दू आणि फारसी’ भाषेत ठेवले आहे.

३. आम्ही पांडवांची सेना सिद्ध केली आहे. आम्हाला हिंदु राष्ट्र हवे असल्याने आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत.

४. देशात वर्ष १९४२ मध्ये अपवित्र गट सिद्ध झाले. ‘धर्मनिरपेक्षता’, ‘इस्लामीकरण’ आदी नावांनी गट सिद्ध झाले. राष्ट्रविरोधी विचारधारा निर्माण करून देशाचे तुकडे करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. यामागे विदेशी शक्ती कार्यरत असून तीच या गटांना अर्थसाहाय्य करत आहे. याचा हिंदूंनी गांभीर्याने विचार करायला हवा.

५. या गटांनी न्यायपालिका, सरकारी कार्यालये, संस्था, प्रशासन आणि राजकारण येथे स्वतःचे अस्तित्व वाढवण्यास प्रारंभ केला आहे. ख्रिस्ती मिशनरी सहयोग सिद्ध झाला आहे.

६. अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाल्यानंतर मानवाधिकार संघटना त्यांच्यासाठी अभियोग चालवतात. देशात जिहादी कारवाया चालू असून धर्मांध हिंसक कारवाया, तसेच सैनिक आणि पोलीस यांच्यावर दगडफेक करत आहेत. असे असतांनाही डाव्या विचारसरणीचे ‘शांतीभूषण पुरस्कार’प्राप्त निवृत्त न्यायाधीश धर्मांधांवर कारवाई होऊ नये, यासाठी सर्वाेच्च न्यायालयाला पत्र पाठवतात. त्यामुळे धर्मांध आणि डावे यांची बाजू घेणारे लोक खोटे लोक आहेत. त्यांना विरोध करायला हवा.

७. शैक्षणिक क्षेत्रातही नागरी नक्षलवाद पसरला आहे. ‘समलैगिंकता’ या विषयावर ते चर्चा घडवून आणतात. त्यामुळे शहरी नक्षलवाद्यांकडून संस्कृती आणि संघटन यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधना करणे आवश्यक ! – श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल

हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविषयी घराघरांत जाऊन जागृती केली पाहिजे. त्यासमवेत साधनाही केली पाहिजे. ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; मात्र त्यासाठी आपण साधना करायला हवी. त्याशिवाय संकटे दूर होणार नाहीत. साधना केल्याने माझ्या जीवनातील संकटेही दूर झाली आहेत.