गोरक्षक हनुमंत परब यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद

तक्रारीवर कारवाई करण्याची मुख्य सचिवांना सूचना

श्री. हनुमंत परब

पणजी, १३ जून (वार्ता.) – ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांना पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून नोंद घेण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर कारवाई करून माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे.

 (सौजन्य : Herald TV)

११ मार्च २०२२ या दिवशी पिसुर्ले गावातून होणार्‍या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता. या वेळी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी श्री. हनुमंत परब यांना पोलीस ठाण्यात नेऊन तेथे अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेविषयी पोलीस तक्रार होऊनही, तसेच पोलीस महासंचालकांनी या घटनेविषयी अन्वेषण करण्याचे आदेश देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईची ३ मास वाट पाहिल्यनंतर श्री. हनुमंत परब यांनी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यासाठी सत्तरी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, तसेच याविषयी १९ मे या दिवशी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते.