नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला फासावर लटकवण्याच्या कृतीला माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांचा विरोध : मुसलमानांकडून प्रसाद यांच्यावर टीका

टीका करतांना मुसलमानांकडून चिथावणीखोर विधानांचा वापर !

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद

नवी देहली – नूपुर शर्मा यांच्याविरोधात बेळगावमध्ये मुसलमानांनी शुक्रवारच्या नमाजानंतर एका मशिदीसमोर त्यांच्या पुतळ्याला फासावर लटकवले होते. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी या घटनेचा ट्वीटद्वारे निषेध केला. यामुळे ट्विटरवर अनेक मुसलमानांनी प्रसाद यांचा विरोध करायला आरंभ केला.

प्रसाद यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला फासावर लटकवण्याचे दृश्य पुष्कळ भयावह आहे. हे २१ वे शतक चालू आहे, असे वाटत नाही. राजकारणाला बाजूला सारून लोकांनी विवेकाने काम करायला हवेे.’ प्रसाद यांच्या या वक्तव्याच्या विरोधात अनेक मुसलमानांनी हिंसेला प्रवृत्त करणारे ट्वीट केले. यासह काही मुसलमानांनी ‘अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या विध्वंसाची छायाचित्रे अथवा रांची येथील पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांवर केलेल्या कारवाईची छायाचित्रे प्रसारित करत नूपुर शर्मा यांच्या पुतळ्याला फासावर लटकवण्याच्या घटनेचे समर्थन केले.

संपादकीय भूमिका

चिथावणीखोर ट्वीट करणार्‍या मुसलमानांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !