अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीचे पहिले सत्र
मंदिरांवरील इस्लामी आणि ख्रिस्ती अतिक्रमणाच्या आघाताला मान्यवरांनी फोडली वाचा !
रामनाथी, १३ जून (वार्ता.) – पोर्तुगीज सरकारच्या काळात गोवा येथील लहान-मोठी अशी १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. यांत वरेण्यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी (शंखवाळी) ही केवळ २ मंदिरे चर्चच्या आक्रमणापासून वाचली. ही मंदिरे राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. असे असतांनाही मागील अनेक वर्षे या मंदिराची भूमी गिळंकृत करण्याचे षड्यंत्र चर्चच्या माध्यमातून चालू आहे. गोवा येथील चर्चंनी बळकावलेल्या मंदिरांच्या पूनर्स्थापनेसाठी हिंदूंना एकत्रित लढा द्यावा लागेल, असे आवाहन गोवा येथील ‘भारत माता की जय संघा’चे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी ‘मंदिरांवर झालेले इस्लामी आणि ख्रिस्ती अतिक्रमण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादव, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर उपस्थित होते.
या वेळी प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले,
१ . वरेण्यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी या मंदिरांची भूमी गिळंकृत करण्यासाठी मंदिराच्या परिसरातील झाडे तोडणे, शेजारील तलाव बुजवणे यांसह अनेक अवैध गोष्टी चालू आहेत. या संदर्भात हिंदू भाविकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
२. विजयादुर्गादेवी हे स्थान पुरातत्व विभागाकडे ‘फ्रंटीस पिस ऑफ सांकवाळ’ या नावाने संरक्षित आहे. शासकीय स्तरावरही हे स्थान जतन करण्यासाठी अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे.
३. या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना कोणतीही कृती करता येत नाही. असे असतांनाही येथे धार्मिक कार्यक्रम करून ‘ही भूमी चर्चची आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न ख्रित्यांकडून चालू आहे.
४. मागील १० वर्षांपासून चर्चच्या माध्यमातून ही भूमी बळकवण्याचे षड्यंत्र चालू असून याला विरोध करणार्या हिंदूंवर खोटे गुन्हे नोंद करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
५. मंदिर परिसरात असलेले मंदिरांच्या अवशेषांचे दगड जेसीच्या साहाय्याने ती भूमीत गाडून टाकण्यात आली.
६. या परिसरात अन्य भागातून अनेक ख्रिस्त्यांची पदयात्रा काढून या भागाला भेट दिली जाते आणि हा भाग चर्चचा असल्याचे लादले जात आहे.