‘हिंदू मतदारांना मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सूचना देतो की, या खोट्या राष्ट्रवाद्यांना जर तुम्ही सत्ताभ्रष्ट केले नाहीत, तर हा गांधाळ हिंदीवाद (आजच्या भाषेत ‘सेक्युलर’वाद) भारतातील मुसलमानांना सैन्य, आरक्षक (पोलीस) दल, तसेच राज्यकारभार यांतील महत्त्वाची स्थाने देईल आणि ज्या वेळी चारही दिशांनी बाहेरचे मुसलमान भारतावर आक्रमण करतील, तेव्हा हे मोक्याच्या स्थानी नेमलेले मुसलमान आतून अचानक उठाव करून या असावध गांधीवादी शासनाला पदच्युत करून या भारताचे अखंड पाकिस्तान करतील. हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षांतील नव्हे, तर दोन विचारसरणींतील एक पसंत करावयाची आहे. भारतीय राज्य कि हिंदू राज्य ? हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे, ‘इस्लामी राज्य’ कि ‘हिंदू राज्य (हिंदु राष्ट्र)’? अखंड हिंदुस्थान कि अखंड पाकिस्तान ?
अशा परिस्थितीत केवळ हिंदूसंघटन करणारी विचारधाराच या देशाचे रक्षण करून येथे सिंधुपासून सेतुबंधापर्यंत पुन्हा अखंड हिंदुस्थान निर्माण करू शकेल !’
– स्वातंत्र्यवीर सावरकर
(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’)