(म्हणे) ‘पाकमध्ये नाही, तर भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात !’

भारताने पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाचा निषेध केल्यावर पाकच्या उलट्या बोंबा !

पाकच्या कराची शहरातील मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या कराची शहरातील श्री मरीमाता मंदिर आणि श्री हनुमान मंदिर येथे अज्ञतांनी आक्रमण करून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली होती. या प्रकरणी भारताने पाकवर टीका केली होती. त्यावर पाकने प्रत्युत्तर देत भारतातच अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला.

१. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले होते की, आम्ही पाकमधील हिंदूंच्या मंदिरांच्या करण्यात आलेल्या तोडफोडीची नोंद घेतली आहे. हे पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्यांकांचे सुनियोजित शोषण आहे. याचा आम्ही निषेध करतो. पाकने अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे.

२. भारताच्या या विरोधानंतर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरच आरोप केला की, भारतातील सरकारी यंत्रणांकडून पाठिंबा मिळत असलेल्या धार्मिक संघटना मुसलमान समाजाच्या विरोधात कार्य करत आहेत. याउलट आम्ही मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई केली आहे, तसेच दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. पाक सरकार संपूर्ण शक्तीनिशी त्यांचा बंदोबस्त करील. (जसे काही पाकने उपकारच केले आहेत ! गेल्या ७५ वर्षांत पाकमध्ये किती हिंदूंचा वंशसंहार झाला ?, किती हिंदूंना पलायन करणे भाग पडले ?, किती हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले ?, याविषयी पाक का बोलत नाही ? भारताने याचा जाब विचारला पाहिजे ! – संपादक)

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानसह इस्लामी देशांनी भारताला विरोध केल्यावर भारताने असे प्रत्युत्तर का दिले नाही ? इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांवर त्या त्या वेळी आवाज का उठवला नाही ? भारतापेक्षा पाकचे सरकार डावपेचांत अधिक हुशार आहे, असे यातून जगाला वाटू शकेल !