देहली पोलिसांकडून चिथावणीखोर भाषणावरून असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा नोंद

असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद

नवी देहली – चिथावणीखोर भाषण केल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम् पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्यावर देहली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

(केवळ मुसलमान नेत्याच्या विरोधात नको; म्हणून हिंदूंच्या संतांवरही गुन्हा नोंद करण्याचा देहली पोलिसांनी प्रयत्न केला आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) यापूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांवर चिथावणी भाषण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. दुसरीकडे नूपुर शर्मा यांच्या विरोधात एम्.आय.एम्.च्या कार्यकर्त्यांनी देहलीच्या संसद मार्गावर निदर्शने केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २०-२५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.