अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुमन सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. अधिवेशनाचा शुभारंभ शंखनादाने होत असतांना

अ. ब्रह्मांडातून पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आणि तेजतत्त्व संपूर्ण सभागृहात प्रक्षेपित होत आहे आणि साक्षात् श्रीविष्णु विराट स्वरूपात विराजमान झाला आहे’, असे जाणवले.
आ. हे दृश्य सर्व देवता पहात असतांना त्यांच्या मुखावर हास्य दिसत होते.
इ. ‘सभागृहातील सर्व साधक आणि धर्मप्रेमी यांच्यावरील आवरण शंखनादामुळे नष्ट झाले आहे अन् सभागृहातील शांतता वेगळ्याच प्रकारची आहे’, असे जाणवले.

कु. सुमन सिंह

२. दीपप्रज्वलनाच्या वेळी

अ. दीपप्रज्वलनाच्या वेळी सप्तरंगी प्रकाशाचे किरण प्रक्षेपित होतांना दिसत होते. ते पाहून ‘सर्व संत आणि सद्गुरु दीपप्रज्वलन करत आहेत’, असे वाटले.
आ. ‘वातावरणातील रज-तम आणि भ्रष्टाचाररूपी अंधकार ज्ञानरूपी दीपाच्या माध्यमातून नष्ट होत आहे आणि या शरिराला ईश्वर शक्ती देत आहे’, असे जाणवले.

३. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे विषय घेत असतांना

अ. जेव्हा सद्गुरु पिंगळेकाका विषय घेत होते, तेव्हा सभागृहात लाल प्रकाश दिसत होता. तो लाल प्रकाश वातावरणात पसरल्यामुळे सर्वांचे मन विषयाशी एकरूप झाले होते.
आ. सद्गुरु काकांच्या पाठीमागे वलय निर्माण झाले. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर आणि वाणीत क्षात्रतेज जाणवत होते.
इ. संपूर्ण सभागृहात एक दिव्य सुगंध येत होता, तसेच सभागृहातील दिव्याच्या प्रकाशात वाढ झाली असूनही तो ईश्वराचा दिव्य प्रकाश आहे’, असे लक्षात आले.
ई. सद्गुरु काका घेत असलेला विषय ऐकतांना आतून क्षात्रतेज, ब्राह्मतेज जागृत होत आहे, असे मला जाणवले आणि त्या वेळी माझे आज्ञाचक्र जागृत होत होते.
उ. ‘संपूर्ण शरीर, मन आणि बुद्धी हिंदु राष्ट्रासाठी सिद्ध होत आहे’, असे जाणवत होते.
ऊ. सद्गुरु काकांचे मार्गदर्शन म्हणजे दिव्य ज्ञान आहे. ‘ते ज्ञानाचा वर्षाव करत आहेत आणि त्या वर्षावाने सर्व जण सिद्ध होत आहेत’, असे जाणवत होते.
ए. ‘हे सर्व पृथ्वीलोकावर नव्हे, तर उच्च लोकात घडत आहे’, असे जाणवले.

६. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकतांना

अ. दादांचे मार्गदर्शन ऐकतांना मनाची एकाग्रता वाढत होती.
आ. ‘त्यांच्या वाणीवर श्री सरस्वतीमाता विराजमान असून ती सर्वांना मार्गदर्शन करत आहे आणि कोणतेही विघ्न येऊ नये; म्हणून श्री गणेश लाल प्रकाशाच्या माध्यमातून उपस्थित आहे अन् तोच दादांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे’, असे जाणवले.

७. पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना शांत आणि स्थिर वाटत होते. त्या वेळी संपूर्ण सभागृहात शीतलता वाटून चंदनाचा मंद सुगंध येत होता.

– कु. सुमन सिंह, वाराणसी (१९.६.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक