हिंदूंनो, परिधान करा उत्साहाने नवचैतन्याला ।।

‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन’ हे ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे. आगामी काळात हे क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. त्याची महती गायली जाईल; पण ‘गुरुदेवांनी याचे आयोजन का केले आणि आता हिंदूंनी कृतज्ञता म्हणून तरी काय करायला हवे ?’, असा विचार करतांना सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

प्रतिवर्षी होई इथे एक ज्ञानसोहळा ।
जणू वैकुंठलोकीचा हा कुंभमेळा ।। १ ।।

सौ. स्वाती शिंदे

शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू ।
भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा ।
म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।। २ ।।

निद्रिस्त हिंदूंनो, कृपा ही भगवंताची जाणा रे ।
नियोजन केले आहे श्रीकृष्णानेच हो सारे ।
तुमच्याचसाठी जमले संत, सज्जन पहा रे ।। ३ ।।
द्वापरयुगी गोप-गोपींनी लावली होती काठी गोवर्धनाला ।
केवळ एवढेच तर करायचे आहे या कलियुगी तुम्हाला ।। ४ ।।

झटका आता त्या जन्मोजन्मीच्या निद्रिस्तपणाला ।
आणि परिधान करा उत्साहाने नवचैतन्याला ।। ५ ।।

– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०१८)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक