मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

ऑस्टेलियाच्या दौर्‍यावर असलेल्या सूर्या यांचा व्हिसा रहित करण्याची ऑस्ट्रेलियातील मुसलमानांची मागणी !

खासदार तेजस्वी सूर्या

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – मोगल आक्रमकांचा इतिहास हा हिंसात्मक आणि रक्तरंजित आहे. हा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखा आहे, असे विधान भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ऑस्ट्रेलियातील पैरामाटा येथील ‘ऑस्ट्रेलिया इंडिया यूथ डायलॉग’ या कार्यक्रमात केले. यासाठी सूर्या यांनी अमेरिकी इतिहासकार विल ड्यूरेंट यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला.

ते पुढे म्हणाले की, हिंदूंनी अशा राजकीय पक्षाला मत द्यायला हवे, जो पक्ष हिंदूंचे रक्षण करील. जगामध्ये ज्यू लोकांवर झालेल्या अत्याचारांवर विविध चित्रपट आणि संग्राहलये आहेत; परंतु हिंदूंवर टिपू सुलतान, महंमद घोरी, अलाउद्दीन खिलजी यांनी केलेल्या अत्याचारांविषयी कुणी काही बोलतांना दिसत नाही. (हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक) यासह सूर्या यांनी हलाल भोजनावर बंदी आणण्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीचे समर्थनही केले.

संघटित मुसलमानांकडून सूर्या यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध !

ऑस्ट्रेलियातील मुसलमानांनी सूर्या यांचा व्हिसा रहित करण्यासाठी प्रविष्ट केलेल्या ऑनलाईन याचिकेवर ५ सहस्र ६०० हून अधिक मुसलमानांनी स्वाक्षरी केल्या. मुळात हा कार्यक्रम पैरामाटा येथील स्वाइनबर्न तंत्रज्ञान विश्‍वविद्यालयाच्या ई.सी.ए. महाविद्यालयात होणार होता; परंतु या कार्यक्रमाला ‘स्वाइनबर्न इस्लामिक सोसायटी’कडून जोरदार विरोध करण्यात आला. इस्लामिक सोसायटीने ‘विश्‍वविद्यालयाला हा कार्यक्रम रहित होण्यासाठी हस्तक्षेप करावा’, असे पत्र लिहिले. त्याची नोंद घेत विश्‍वविद्यालयाने ३१ मे या दिवशी होणारा हा कार्यक्रम रहित केला. तेजस्वी सूर्या यांचा कार्यक्रम होणार असल्याचे कळताच ऑस्ट्रेलियातील मुसलमान विद्यार्थी, तसेच त्यांच्या विद्यार्थी संघटना आणि धार्मिक संघटना यांनीही विरोध केला.

संपादकीय भूमिका

जगभरातील मुसलमान हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात कशा प्रकारे संघटित होतात, याचे हे उदाहरण होय. हिंदू कधी त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात तरी संघटित होतात का, याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा !