सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

प्रातिनिधिक चित्र

मुंबई – ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे, असे ट्वीट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या करण्यात येत आहेत. २ जून या दिवशी काश्मीरमधील विजय कुमार नावाच्या बँक व्यवस्थापकांची आतंकवाद्यांनी हत्या केली. या पार्श्‍वभूमीवर संदीप देशपांडे वरील ट्वीट केले.