नाशिक – सामाजिक माध्यमांवर विविध संकेतस्थळांवरील ‘चाईल्ड पॉर्न व्हिडिओ’ आणि अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्यास कारवाई होऊ शकते. गेल्या काही मासांत या लिंक पाहून त्या प्रसारित करणार्या शहरातील २५ जणांची माहिती ‘नॅशनल क्राइम ब्युरो’कडून (एन्.सी.आर्.बी.) पोलीस आयुक्तांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विरोधात थेट माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार ‘चाईल्ड पॉर्न व्हिडिओ’ प्रसारित केल्याविषयी सायबर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. सामाजिक संकेतस्थळांवरील अश्लील व्हिडिओ पाहून ते पाठवणार्यांवर संबंधित संकेतस्थळांच्या विदेशातील सर्व्हरकडून लक्ष ठेवले जात आहे.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व्हावे, यासाठी सरकारने वर्ष २००० मध्ये गंभीर स्वरूपाचे कायदे केले आहेत. या कायद्यांमध्ये २ ते १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक गोष्ट राज्य ‘सायबर क्राइम’कडून प्राप्त झालेल्या माहितीतून दिसून येत आहे. नाशिकसारख्या शहरात गेल्या ३ वर्षांपासून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे ४० हून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाच्या २ वर्षांचा काळात १५ प्रकरणे, तर गेल्या वर्षभरात २५ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
सामाजिक संकेतस्थळांकडून ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’सारखा गुन्हा करणार्या भ्रमणभाषधारकांची माहिती तात्काळ भारताच्या ‘नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरो’ला (एन्.सी.आर्.बी.) पाठवण्यात येते. एन्.सी.आर्.बी. ही माहिती प्रत्येक राज्याच्या सायबर सेल मुख्यालयाकडे पाठवते.
संकेतस्थळांवर ‘चाईल्ड पॉर्न’विषयी माहिती शोधल्यास कारवाई !‘‘संकेतस्थळाचा वापर करतांना ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’ संदर्भात कुठली माहिती शोधू नये, डाऊनलोड आणि अपलोडही करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई होईल. कुठल्याही सामाजिक माध्यमांद्वारे असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास याविषयी सोशल मीडिया टीम आणि cybercrime.gov.in या संकेतस्थळाला माहिती द्यावी.’’ – डॉ. तन्मय दीक्षित, सायबरतज्ञ |
संपादकीय भूमिकाकेवळ ‘चाईल्ड पॉर्न’ पहाणार्यांवर नव्हे, तर सर्वच ‘पॉर्न’ संकेतस्थळे पहाणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! |