ऐसा आगळा गुरु-उपासक प्रथमच म्यां पाहिला ।

सौ. श्रावणी फाटक

भक्तराज या गुरुमाऊलीची ।
झाली त्या सवे भेट ।।
साधनारत या शिष्यावरी केली ।।
गुरुकृपा ही थेट ।। १ ।।

जिज्ञासूंचे शंकानिरसन ।
अन् साधकांसी दाविती नवयोग ।।
आत्मशोधासह आत्मबोधही ।
आगळा हा गुरुकृपायोग ।। २ ।।

पूर्वजांच्या त्रासास्तव । जप श्री दत्तगुरूंचा ।
आध्यात्मिक उन्नतीसाठी ।। जप कुलदेवतेचा ।। ३ ।।

पूर्वसंचित प्रारब्धभोगांचा । सांगती सर्वांस खेळ ।।
घालावया सांगती सर्वांस । क्रियमाण कर्माचा मेळ ।। ४ ।।

साधकांसी मार्गदर्शन । हे नव्याने भावे ।।
आध्यात्मिक संशोधनात । यांचे स्थान उजवे ।। ५ ।।

अहं-निर्मूलनासह । स्वभावदोषही शोधावया शिकविले ।।
ऐसा आगळा गुरु-उपासक । प्रथमच म्यां पाहिला ।। ६ ।।

नाम, सेवा, त्याग, प्रीती । अन् सत्संगासह अनुभूती ।।
भावजागृती प्रयोग करण्या । नव्याने आम्हा शिकविती ।। ७ ।।

आध्यात्मिक वारसदार हे । सर्व जगाहूनी आगळे ।।
सत्शिष्या दाविती । गुरुप्रीतीचे भावरम्य सोहळे ।। ८ ।।

– सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.५.२०२२)