भाग्यवान मातेच्या पदरी, बाळकृष्ण हा शोभे ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

सूर्य उगवला ।
प्रकाश पडला ।।
वैशाख वद्य सप्तमीस ।
नागोठणे ग्रामी जन्मला ।। १ ।।

सौ. श्रावणी फाटक

देवकीपरी ही,
भाग्यवंत माता ।
अंतरी बहु तोषली ।।
नलिनी, बाळाजी उभयतां ।
धन्य धन्य जाहली ।। २ ।।

आनंदानुभूती घेऊनी माता ।
नाम ‘जयंत’ त्याचे ठेवी ।।
कृष्णलीला ही खरीच न्यारी ।
का हिच्या पोटी यावे ।। ३ ।।

गतजन्मीचे बहु पुण्य ते ।
या जन्मी तिज लाभे ।।
भाग्यवान मातेच्या पदरी ।
बाळकृष्ण हा शोभे ।। ४ ।।

हलकेच सयांनो हलवा पाळणा ।
बाळ आता झोपला ।।
जरी आपणां दिसे झोपला ।
हिंदूजागृतीस आला ।। ५ ।।

– सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक