२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रम दाखवण्यात आला. तो पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरुदेव सिंहासनावर बसल्यावर माझ्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश दिसला. तेव्हा ‘अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्र सिंहासनावर बसले आहेत’, असे मला जाणवले.
२. त्याच वेळी ‘सभामंडपात देवता, गंधर्व, ऋषिमुनी आणि प्रभु श्रीरामचंद्रांच्या परिवारातील सर्व जण उपस्थित आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते.
३. आकाशातून श्रीरामावर पुष्पवृष्टी होत होती.
४. हे दृश्य पहातांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते.
‘गुरुदेवांनी मला अयोध्येत नेऊन प्रभु रामरायाचे दर्शन घडवले’, त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. विष्णुदास म्हात्रे, पनवेल (२.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |