ही तुझी प्रीती, ही तुझीच कृपा ।
मुक्तीचा मार्ग तू केलास सोपा ।। १ ।।
सत्संग, सत्सेवा देऊन केलीस तूच प्रगती ।
‘सनातन प्रभात’मुळे जीवनाला मिळाली गती ।। २ ।।
वेळोवेळी अनुभवत होते तुझी कृपा, तुझी प्रीती ।
आनंद अन् समाधान देण्याची तुझी ही आगळी रिती ।। ३ ।।
पत्र माध्यमातून सतत मिळाले तुझे मार्गदर्शन ।
योगायोगाने मिळत होते तुझे हास्यमधुर दर्शन ।। ४ ।।
सांग ना देवा, कसे व्हावे तुझे आम्ही उतराई ।
नतमस्तक होण्या यावे का तुझ्या पायी ।। ५ ।।
स्वामी स्वरूपानंदांनी जीवनात गुढी उभारली (टीप) ।
तुझ्या कृपेचे श्रीफळ (टीप १) घेऊनी पौर्णिमा आली ।। ६ ।।
तुझ्या कृपारूपे मिळाले गणेशाचे बळ ।
लाभता विद्यामाजी सकळ ।। ७ ।।
होतसे प्रवेश अज्ञ बाळाचाही ।
शंका येथे तीळमात्र नाही ।। ८ ।।
गुरुराणा, तुझे उदार वचन ।
अभयाचे देशी वरदान ।। ९ ।।
जयावरी होते तुझी कृपादृष्टी ।
बदलून जाते त्याची जीवसृष्टी ।। १० ।।
म्हणोनि निवांत होऊनी भले ।
देवराण्यासी या नमन केले ।। ११ ।।
टीप – पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंद यांनी २४ व्या वर्षी अनुग्रह आणि गुरुमंत्र दिल्याने साधनेला आरंभ झाला.
टीप १ – वर्ष १९९६ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केली. वर्ष २०२१ मधील नारळीपौर्णिमेच्या दिवशी ६१ टक्के पातळी घोषित होऊन साधनेचे श्रीफळ मिळाले.
– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७४ वर्षे), बेळगाव (२२.८.२०२१) (नारळीपौर्णिमेच्या दिवशी स्फुरलेले काव्य)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |