भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे केले प्रतिपादन !

केरळचे राज्यपाल आरिफ खान

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारतामध्ये योग्य शिक्षणाचा प्रसार करून भारताची प्राचीन संस्कृती आणि सनातन धर्माचे सिद्धांत यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. या दिशेने जाणे, याचा अर्थ आपल्याला मागे जायचे नाही, तर सनातन सिद्धांतांना पुनर्प्रस्थापित करायचे आहे. हे शिक्षणाविना शक्य नाही, असे वक्तव्य केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केले. ते उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.

खान पुढे म्हणाले…

१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, मानवी जीवनाचा उद्देश ज्ञानाची प्राप्ती करणे हा असून नम्रता हा ज्ञानाचा परिणाम आहे. ज्या व्यक्तीमध्ये नम्रता असते, तिला कुणी न्यून लेखू शकत नाही.

२. भारत विविध समुदायांचा समूह आहे. येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. आपला देश नेहमीच सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कर्ता राहिला आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.

३. भारत एक असा देश आहे, जिथे इस्लाम, यहुदी और ख्रिस्ती यांच्यासमवेत कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. मदीनेनंतर भारतातच पहली मशीद उभारण्यात आली होती आणि तीही एका हिंदु राजाने उभारली होती.