(म्हणे) ‘कोरेगाव-भीमा प्रकरणी भिडेगुरुजी यांच्यावर कारवाई व्हायला हवी !’ – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, भारिप

सोलापूर – कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्यात आले असले, तरी त्याविषयी सखोल अन्वेषण करून सबळ पुरावे शोधावेत. भिडे गुरुजींवर कारवाई होण्याविषयी मी आग्रही आहे, असे मत भारिपचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रामदास आठवले सध्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. तेथील शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘अन्वेषण यंत्रणेला भिडे गुरुजींच्या विरोधातील ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव वगळले गेले असेल; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई व्हायलाच हवी’, असेही ते म्हणाले. (पोलिसांनी अन्वेषण केलेले असूनही केवळ राजकीय स्वार्थापोटी पू. भिडेगुरुजींवरील कारवाईचा अट्टाहास करणे अयोग्य आहे, हा पराकोटीचा द्वेषच नव्हे का ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

असे म्हणणे म्हणजे स्वतःला अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते, असे समजण्यासारखे आहे !