भीलवाडा (राजस्थान) – येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या घटनेमुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हे आक्रमण कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घायाळ झालेल्या तरुणांची नावे सद्दाम आणि आझाद अशी आहेत.
#Rajasthan | After Jodhpur, Bhilwara Tense Over Attack on Two Youths; Internet Suspended https://t.co/h01aQpCUYT pic.twitter.com/wgmQlfkObP
— News18.com (@news18dotcom) May 5, 2022
(म्हणे) ‘दंगल घडवण्याचे संघ आणि भाजप यांचे धोरण !’ – मुख्यमंत्री गेहलोत
या प्रकरणी राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न रा.स्व. संघ आणि भाजप करत आहेत. याद्वारे ते त्यांचे धोरण राबवत आहे. आम्ही राज्यात दंगली होऊ देणार नाही. (भारतभर दंगली कोण घडवून आणतात, हे जनता जाणून आहे ! – संपादक)