३ मे या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्या निमित्ताने…
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी महर्षी आणि संत वेळोवेळी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगतात. २०.४.२०२० या दिवशी वैदीश्वरन् (तमिळनाडू) येथील ‘अगस्ती जीवनाडी’चे वाचक श्री. कमलकण्णन् यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली पाहून पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगितला –
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी (२६.४.२०२० या दिवशी) त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुरु (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच एक पुरुष संत यांना दान द्यावे. एका तबकात भगवे वस्त्र (स्त्री संतांना साडी अन् पुरुष संतांना धोतर-उपरणे), तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा ठेवून ते संतांना दान द्यावे. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिन्ही संतांच्या डोक्यावर अक्षता घालून त्यांना आशीर्वाद द्यावा.’ त्यानुसार अक्षय्य तृतीयेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्ते सद्गुरुद्वयींना आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दान देण्यात आले. ‘अक्षय्य तृतीयेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांना दान दिलेल्या वस्तूंवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन येथे दिले आहे.
(महर्षींनी सद्गुरुद्वयींचे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ‘ आणि ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ असे नामकरण करण्यापूर्वीचा लेख असल्याने त्यांचा उल्लेख सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ असा केला आहे. – संकलक)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तू
१ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दान दिलेल्या वस्तू : साडी, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा
१ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना दान दिलेल्या वस्तू : साडी, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा
१ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना दान दिलेल्या वस्तू : धोतर-उपरणे, तुळशीची माळ, फळे आणि दक्षिणा
२. चाचणीतील निरीक्षणे
या चाचणीत संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंची निरीक्षणे करण्यात आली.
अ. संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या वस्तूंच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे
टीप – चाचणी स्थळाची जागा अपुरी पडल्याने काही घटकांची प्रभावळ २२.५५ मीटरच्या पुढे मोजता आली नाही. त्यामुळे बाजूला दिलेल्या सारणीत त्या घटकांच्या प्रभावळीच्या पुढे ‘२२.५५ मीटर पेक्षा अधिक’, असे लिहिले आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. अक्षय्य तृतीयाचे महत्त्व : ‘वैशाख शुद्ध तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः ।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव ॥ – मदनरत्न
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना दान देण्यासाठीच्या वस्तूंना हस्तस्पर्श केल्याने वस्तूंमध्ये चैतन्य संक्रमित होणे : संतांना दान दिलेल्या वस्तू सात्त्विक असल्याने त्यांमध्ये आरंभीही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हस्तस्पर्शाने त्या वस्तूंमध्ये चैतन्य संक्रमित झाल्याने त्यांतील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली.
अक्षय्य तृतीयेला हा वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे म्हणजे ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळून त्यांचे महान कार्य पूर्णत्वास जाणार’, असा जणू संकेत
मिळत आहे.’
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.५.२०२०)
ई-मेल : [email protected]
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |