इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २७ एप्रिल (वार्ता.) – येथील ‘भाऊ ग्रुप’च्या वतीने महारुद्र हनुमान मंदिरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६.५३ वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पाहार घेतला.
एकीकडे भोंग्यांचं राजकारण तर कोल्हापुरात सामाजिक सलोखा; हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजनhttps://t.co/9huGRSeFWb#kolhapurichalkaranji #iftarparty #loudspeaker
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2022
या प्रसंगी अजिज खान यांनी सांगितले, ‘‘सध्या मुसलमान समाजाचा पवित्र रमजान मास चालू आहे. त्यानिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात चालू असलेल्या जातीयवादाकडे दुर्लक्ष करत सर्वांनी आपसात समन्वय ठेऊन जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि बंधुता कायम ठेवावी. आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून ठेवण्याचे दायित्व सर्वांचे आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते.’’ (अजिज खान यांनी सर्वधर्मसमभावाचे हेच ‘डोस’ देहली येथील दंगल करणार्या धर्मबांधवांना द्यावेत. नुकत्याच झालेल्या श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकांमध्ये दगडफेक करणारे धर्मांधच होते. त्यामुळे खान यांनी प्रथम त्यांच्या धर्मबांधवांना अन्य धर्माचा आदर करण्यास सांगावे ! हिंदूंना ते सांगण्याची आवश्यकता नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|