पू. सौरभदादा विकलांग असूनही बालपणी संतपदी पोचले ।

चैत्र कृष्ण अष्टमी (२३.४.२०२२) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी यांचा २६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग येथील श्री. दत्तात्रय रघुनाथ पटवर्धन (वय ७० वर्षे) यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्यपुष्प पुढे दिले आहे.

पू. सौरभ जोशी
श्री. दत्तात्रय पटवर्धन

जन्मापासूनी विकलांग असूनही बालपणी संतपदी पोचले ।
पू. सौरभदादा जोशी कुलदीपक झाले ।। १ ।।

श्री. संजय आणि सौ. प्राजक्ता जोशी
लौकिक पिता अन् मातोश्री यांचे ।
परंतु अलौकिक आध्यात्मिक पिताश्री
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ।। २ ।।

बंधू कनिष्ठ यांचा दीप करतो गुरुकृपायोगानुसार साधना ।
आध्यात्मिक प्रगती त्याचीही होऊ दे
हीच ईशचरणी प्रार्थना ।। ३ ।।

पू. सौरभदादांचा आहे शुभ वाढदिवस ।
त्यांच्या चरणी वंदन करितो,
प्रार्थितो गुरुसेवेचा ध्यास ।। ४ ।।

पू. सौरभदादांना लहानपणापासून पाहिले ।
अभ्यास करता सर्वांगे त्यांचा,
पुढील श्लोकात मला ते दिसले ।। ५ ।।

मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।

अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.’

– श्री. दत्तात्रय रघुनाथ पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१५.४.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक