श्रीचरणी हृदयाने केला कृतज्ञतेने नमस्कार ।

पुष्पांजली पाटणकर

देव उभा सागरतीरी, घेऊनी सद्भावाची ओंजळ ।
सोडिले त्याने हळूवार ओंजळीतील जळ ।। १ ।।

ओंजळ जळातील हृदयाने गाठला त्वरित सागर तळ ।
त्या हृदयाला कठीण झाला होता एक एक पळ (क्षण) ।। २ ।।

शेषाच्या मस्तक मण्याचा पसरला होता नील प्रकाश ।
शेष शय्येवर पहुडले होते श्रीविष्णु लक्ष्मी समवेत ।। ३ ।।

श्रीचरणी हृदयाने केला कृतज्ञतेने नमस्कार ।
श्रीविष्णु हृदयात आमुचे हृदय मिळून जाता संपला देवाचा भार ।। ४ ।।

– कृष्णपुष्प (पुष्पांजली) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, बेळगाव (२९.११.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक