उत्तरप्रदेश सरकार वृद्ध संत, पुजारी आणि पुरोहित यांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारने वृद्ध संत, पुजारी आणि पुरोहित यांच्या कल्याणासाठी एका मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंडळ या संतांच्या कल्याणाच्या संदर्भातील कार्य पहाणार आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारचे अभिनंदन ! असा निर्णय अन्य राज्यांतील सरकारांनीही घ्यावा !