भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

सीमाभागातून अमली पदार्थांची तस्करी

१. कारगील युद्धाच्या वेळी अन्य देशांकडून भारत सरकारने तोफा आणि तोफगोळे मागवले होते, तेव्हा वर्ष १९७० मधील शस्त्रास्त्रे देऊन भारताची घोर फसवणूक करण्यात आली होती. प्रत्येक ३५ सहस्र रुपये दराने घेतलेल्या ‘सॅटेलाईट इमेज’ २ वर्षांपूर्वीच्या दिल्या गेल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून कारगील युद्धात देशाची प्रचंड हानी झाली; मात्र केवळ सैनिकांमधील शौर्यामुळे देश जिंकला. तत्कालीन तिन्ही संरक्षणदलाचे प्रमुख व्ही.पी. मलिक यांनी ही माहिती स्वतः दिली होती.

(संदर्भ – ‘आपलं महानगर’, संपादकीय, ४.१२.२०१९)

२. कारगील युद्धाला २२ वर्षे होऊन भारत युद्धसामग्री सज्ज झाला आहे का ? त्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता आहे. सैन्यदलाचे ‘बजेट’ प्रतीवर्षी २५ टक्क्यांनी वाढवले, तरीही सैन्यदलाचे आधुनिकीकरण करण्यास १० ते १५ वर्षे लागू शकतात.

(संदर्भ – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, तरुण भारत, २४.७.२०२१)

३. मार्च २०१३ अखेर १७० प्रकारच्या दारूगोळ्यांपैकी ८५ प्रकारचे दारूगोळे १० दिवस पुरतील इतकेही नव्हते. वर्ष २०१७ मध्ये १० दिवस पुरेल इतका दारूगोळा नसल्याचा अहवाल ‘कॅग’ने दिला होता. (संदर्भ – श्री. जयेश राणे, ‘जनशक्ती’, २५.७.२०१७)

४. रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.

कोसळलेले ‘मिग’ विमान

५. काँग्रेसच्या ६ दशकांच्या कार्यकालात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याने ऐन युद्धकाळात शस्त्रास्त्रांची टंचाई सैन्याने अनुभवली. सैन्यदल वेळोवेळी शस्त्रास्त्रांची मागणी करत असते; परंतु त्यावर तातडीने निर्णय घेण्यात विलंब होणे, खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांचा दर्जा सुमार असणे असा अनुभव सैन्यदल मागील ५-६ दशके घेत आले आहे. मोदी शासनाने पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी अत्याधुनिक विमानांची नितांत आवश्यकता भासली.

(संदर्भ – ‘आपलं महानगर’, संपादकीय, ४.१२.२०१९)

५. आयुध कारखाने हे रायफलींचे एकमेव पुरवठादार असल्यामुळे त्यांची मक्तेदारी होती; परंतु तेथे सिद्ध होणारा अर्जुन रणगाडा किंवा तत्सम अनेक उत्पादने यांमध्येही गुणवत्तेत कमतरता आढळून आल्या. त्यामुळे अगदी बुलेटप्रूफ जॅकेटसारख्या साध्या साध्या गोष्टींतही आपली संरक्षणविषयक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयात केली जात होती. (संदर्भ – महाराष्ट्र टाईम्स, १६.८.२०२०)

६. भारतावरील काही आतंकवादी आक्रमणांत ‘गुप्तचर विभागाला माहिती कळली नाही’, असे समोर येते, तर काही ठिकाणी कठीण परिस्थितीत किंवा आक्रमणांत ‘गुप्तचर विभागाने वर वर माहिती दिली अथवा वेळेत किंवा विशिष्ट माहिती दिली नाही’, असे सांगून सैन्य किंवा पोलीस दले स्पष्टीकरण देतात. ‘गुप्तचर यंत्रणांच्या जुजबी माहितीच्या आधारे संभाव्य पूर्वनियोजन अशक्य झाले’, असे सुरक्षा यंत्रणांकडून सांगितले जाते. यावरून भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी दले आणखीन मजबूत अन् सुसंघटित करणे आवश्यक आहे, असे लक्षात येते.

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, पनवेल. (२१.४.२०२२)