‘मे २०२० मध्ये मला एक स्वप्न पडले, ‘पृथ्वीवर सर्वत्र भूकंप, तसेच पूर येऊन सर्व शेती आणि अन्नधान्य पाण्याखाली गेले असून सर्वनाश झाला आहे. त्यामुळे साधकांना खायला काही अन्न नाही. त्या वेळी माझ्याकडून सूर्यदेवाला प्रार्थना झाली. तेव्हा मला सूर्यदेवाचे डोळे दिसून ‘तो एक एक हंडा भरून जेवण पाठवत आहे आणि सर्व साधकांना देत आहे’, असे दिसले.’ हे स्वप्न आठवून मला आनंद मिळतो आणि कशाचीच काळजी वाटत नाही. ‘सूर्याच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वांना सांभाळत आहेत आणि पुढेही तेच सांभाळणार आहेत’, असा विचार मनात येतो अन् मला आनंद होतो.’
– श्रीमती शोभा चांदणे, सनातन आश्रम, मिरज. (२५.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |