सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण ७.०६ टक्के !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील शहरी भागात ११२, तर ग्रामीण भागातील १ सहस्र ६ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये शहरी भागातील १ नमुना, तर ग्रामीण भागातील ७१ नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. यावरून शहरी भागात ०.८९ टक्के, तर ग्रामीण भागात पाणी दूषित होण्याचे प्रमाण सरासरी ७.०६ टक्के  असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्च मासातील दूषित पाण्याच्या अहवालावरून जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे दिसून येते.