रशियन अर्थव्यवस्था कठीण काळातून जाणार ! – रशियाची सेंट्रल बँक

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे रशियाला आर्थिक भुर्दंड

मॉस्को (रशिया) – रशियन अर्थव्यवस्था कठीण काळातून जाणार आहे. अमेरिका आणि तिचे मित्रराष्ट्र यांनी रशियावर लादलेल्या विविध आर्थिक निर्बंधांमुळे रशियाला आर्थिक स्तरावर मोठे पालट करावे लागणार आहेत, असे तेथील सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा एल्विरा नबियुलीना यांनी म्हटले.

त्या पुढे म्हणाल्या की, आर्थिक निर्बंधांमुळे आरंभी अर्थबाजारावर परिणाम होत असला, तरी लवकरच त्याचा देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेवरच वाढता परिणाम होणार आहे. रशियाकडे पुरेसे राखीव चलन जरी असले, तरी त्यातील साधारण अर्धा भाग हा आर्थिक निर्बंधांमुळे गोठला गेला आहे.