मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी अनेक वर्षे जनजागृती करूनही पालट नाही ! – अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र

पालट न होण्यामागे धर्मांधांमधील वाढती धर्मांधता आणि कट्टरतावाद हे दोष कारणीभूत आहेत, हेही या संघटनेने सांगावे ! 


मुंबई – मशिदींवरील भोंग्यांप्रकरणी समाजात अनेक वर्षे जनजागृती करूनही पालट होत नाही, अशी खंत अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस एम्.ए. खालिद यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, सद्य:स्थिती पाहून याविषयी पुन्हा जनजागृती करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरातील शांतता राखण्यासाठी भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे काम आहे. राजकीय लाभासाठी एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये; पण कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविषयी दिलेल्या चेतावणीनंतर मुंबईत झालेल्या पालटावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे कार्यकर्ते आणि बुद्धीजीवी मुसलमान हे मुसलमान धार्मिक नेते अन् मशिदीचे प्रमुख यांच्या भेटी घेऊन त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगणार आहेत.

(म्हणे) राज ठाकरे यांनी भडक वक्तव्य करायला नको होते !’

‘समाजबांधवांचे ऐकायचे नाही, तसेच सर्वोच्च न्यायालयालाही जुमानायचे नाही’, अशी मानसिकता असणार्‍यांसाठी पायघड्या घालायच्या कि त्यांना ज्या भाषेत समजते, त्या भाषेत सांगायचे ?

‘राज ठाकरे यांनी भडक वक्तव्य करण्यापेक्षा त्यावर बैठक बोलावून चर्चा केली असती, तर बरे झाले असते’, असेही महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने म्हटले आहे. ( धर्मांध संघटना हिंदूंविषयी भडक वक्तव्ये करतात, तेव्हा महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिल कुठे असते ? – संपादक) ‘आमच्या कुराण आणि हदीस यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार याविषयी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.