संभाजीनगर – दर आठव्या आणि नवव्या दिवशी नळाला पाणी येत असल्याने संतप्त झालेल्या सिडकोतील महिला आणि नागरिक यांनी माजी नगरसेवक दामू शिंदे यांच्या नेतृत्वात १३ एप्रिल या दिवशी सायंकाळी सिडको एन्. ५ येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले. ‘जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत टाकीवरच मुक्काम करण्यात येईल’, अशी चेतावणी या वेळी आंदोलकांनी दिली. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.