परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे की, ज्यामध्ये प्रत्येक जिवाचा उद्धार होण्याविषयी विचार केला आहे. त्यामुळे एखाद्याला हिंदु धर्मात जन्म मिळाल्यास, तो त्याचे क्रियमाण वापरून याच जन्मात ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. याउलट अन्य पंथ मनुष्यनिर्मित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या धर्मात सांगितल्याप्रमाणे कितीही साधना केली, तरी त्यांची एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. त्यामुळे ईश्वराने एखाद्याला ‘याच जन्मात ईश्वरप्राप्ती व्हावी’, या उद्देशाने हिंदु धर्मात जन्म देऊनही तो धर्मांतरण करत असल्यास तो ‘ईश्वरप्राप्तीची मोठी संधी गमावत आहे’, हे त्याने लक्षात घ्यावे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले