- ‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मुसलमानांसाठी ‘पाकिस्तान’ आणि हिंदूंसाठी ‘हिंदुस्थान’ यांचा जन्म झाला; परंतु हिंदुस्थानला ‘धर्मनिरपेक्ष भारत’ असे पुष्कळ नंतर, म्हणजे २६ जानेवारी १९५० या दिवशी घोषित करण्यात आले.
- जर सर्व स्वतंत्र जातींची स्वतःची राष्ट्रे आहेत, उदा. इंग्रज, फ्रेंच, जर्मन, चिनी, जपानी या लोकांची आपापली राष्ट्रे आहेत, तर हिंदूंना हिंदूंचे ‘हिंदू राष्ट्र’ का नको ?
- सध्याचा प्रत्येक भारतीय ‘हिंदु’ नसल्याने भारत शासन हे हिंदू शासन नसणे : ‘भारतात हिंदू बहुसंख्यांक आहेत; म्हणून ‘भारत शासन हे हिंदू शासन आहे’, हा युक्तीवाद चुकीचा आहे. प्रत्येक भारतीय हा ‘हिंदु’ नाही, त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक शासन हे ‘हिंदू शासन’ असू शकत नाही.
– (मासिक अभय भारत, १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०१०)