अध्यात्मातील आमचे पहिले गुरु आहेत, ‘बाबा’ ।

उद्या चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात रहाणारे श्री. पुंडलिक माळी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. संध्या माळी यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

श्री. पुंडलीक माळी

श्री. पुंडलिक माळी यांना ६७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा  !

कु. संध्या माळी

त्यागी वृत्ती आणि निर्मळ मन ।
हेच आहे साधनेतील खरे धन ।। १ ।।

मायेत न अडकवता आम्हाला साधनेला प्रोत्साहन दिले ।
आमच्यासाठी तन, मन अन् धनही अर्पण केले ।। २ ।।

अध्यात्मातील आमचे पहिले गुरु आहेत, ‘बाबा’ (टीप १)
अध्यात्म जगायला शिकवले लहानपणापासूनच आम्हा ।। ३ ।।

स्वतःसाठी कधीच काही त्यांनी नाही घेतले ।
आम्ही जे घेऊन दिले, तेच त्यांना मनापासून आवडले ।। ४ ।।

परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अव्यक्त भाव आहे त्यांच्यात ।
बाबांमधील सर्व गुण येवो आमच्यात ।। ५ ।।

टीप १ : वडील श्री. पुंडलिक माळी

– कु. संध्या पुंडलिक माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक