हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे आवश्यक ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !

साधकांना मार्गदर्शन करतांना पू. रमानंद गौडा

गदग (कर्नाटक) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रत्येकाला आध्यात्मिक स्तरावर करायचे आहे. त्यासाठी वैयक्तिक आध्यात्मिक साधना करून स्वतःमधील सात्त्विक गुण वाढवायला हवेत. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त व्हावे लागेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. गदग येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पदवीपूर्व महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला हुब्बळ्ळी, गदग, हगरिबोम्मनहळ्ळी, धारवाड येथील अनेक हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यशाळेत समितीचे उत्तर कर्नाटक समन्वयक श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि धारवाडचे समन्वयक श्री. व्यंकटरमण नायक यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना विषद केली. सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनी साधनेचे महत्त्व आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया याविषयी माहिती सांगितली.

वैशिष्ट्यपूर्ण

या कार्यशाळेनंतर धर्मप्रेमींनी ९ ठिकाणी धर्मसभा घेण्याची, तसेच ३ ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. काही धर्मप्रेमींनी समितीच्या कार्यात कृतीशील सहभाग दर्शवला. कार्यशाळेच्या नंतर काही धर्मप्रेमींनी स्वतः मीठ-पाण्याचे उपाय करणे, नामजप करणे आदींसह व्यष्टी साधनेला प्रारंभ केल्याचे सांगितले.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. श्रीमती पार्वती, हगरिबोम्मनहळ्ळी – येथे वेळेचे पालन कसे करायचे, ते शिकायला मिळाले.

२. श्री. श्रीधर पुरोहित, हगरिबोम्मनहळ्ळी – बाहेर व्यक्तीमत्त्वाचा विकास करण्यासाठी सहस्रो रुपये घेतात. ते मानसिक स्तरावरचे असते; परंतु कार्यशाळेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करायचे ? हे विनामूल्य सांगून आमच्या व्यक्तीमत्त्व विकासाला साहाय्य केले. त्यासाठी मी आभारी आहे. हे केवळ हिंदु जनजागृती समितीलाच शक्य आहे.

३. श्री. दुंडप्पा सवणूर, लक्ष्मेश्वर – स्वयंशिस्त कशी पाळायची, हे शिकायला मिळाले, तसेच अनिष्ट शक्तींच्या त्रासावर नामजपादी उपाय शिकायला मिळाले.

४. श्री. बसवराज गरग, हगरिबोम्मनहळ्ळी – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी संघटित होऊन आध्यात्मिक बळावर लढायचे आहे, हे शिकायला मिळाले.