साधकांची सर्वतोपरी काळजी घेणारे सद्गुरु सत्यवान कदम (वय ५९ वर्षे) !

आज चैत्र शुक्ल प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

आज चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा २.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम यांना ५९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘१२.१०.२०२१ या दिवशी आम्ही (मी आणि ३ – ४ साधक) कुडाळ येथे डोळ्यांचे शस्त्रकर्म करण्यासाठी गेलो होतो. दुपारी आम्हा सर्वांची शस्त्रकर्मे झाली. रात्री आम्ही कुडाळ सेवाकेंद्रात निवासाला होतो. मला लघवीचा त्रास असल्यामुळे रात्री २ – ३ वेळा मला झोपेतून उठावे लागते. त्याच वेळी कुडाळ सेवाकेंद्रात सद्गुरु (सुश्री. (कु.)) स्वाती खाडये आल्या असल्याने माझी रहाण्याची व्यवस्था वरच्या माळ्यावर केली होती. तेथे पुरुष प्रसाधनगृह नसल्याने मला प्रत्येक वेळी खालच्या माळ्यावर जावे लागणार होते.

श्री. प्रकाश मराठे

सद्गुरु सत्यवान कदम यांना याविषयी समजल्यावर त्यांनी साधकांना स्वतःच्या (सद्गुरु सत्यवान कदम यांच्या) खोलीत माझ्यासाठी पलंग ठेवायला सांगितला. त्यांनी स्वतःच्या खोलीत माझी झोपण्याची व्यवस्था केली. त्यांनी मला खोलीतील विजेची बटणे दाखवली आणि प्रेमाने माझी विचारपूस केली. तेव्हा माझ्याकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक