श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हनुमान उपासना करण्याचे आवाहन !

मिरज, २८ मार्च (वार्ता.) – श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच २ एप्रिल ते २७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक शनिवारी भक्तांनी श्री हनुमान उपासना करावी. उपासनेच्या संदर्भात काही माहिती अथवा उपासनेची पुस्तके हवी असल्यास त्यासाठी श्री. शामराव साखरे यांना (भ्रमणभाष क्रमांक ९८५०३८०५३८) संपर्क करावा, असे आवाहन श्री. आनंदराव बोधे यांनी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने केले आहे.