नंदवाळ (जिल्हा कोल्हापूर), २८ मार्च (वार्ता.) – करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात गेले आठवडाभर हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याच्या समाप्तीच्या निमित्ताने गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा आणि दिंडी यांचे आयोजन करण्यात आले होते. ही भूमी आरक्षित असल्याने या सोहळ्यास प्रशासनाने विरोध केला होता, तसेच गेले ३ दिवस त्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा चालू होती; मात्र गावकरी त्याच भूमीवर सोहळा करण्यास ठाम होते. २८ मार्च या दिवशी गावकर्यांनी आरक्षित मैदानावर जाण्यास पोलिसांनी विरोध केला. यामुळे धक्काबुक्की होऊन गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यानंतर गावकर्यांनी मैदानाशेजारी ठिय्या आंदोलन करून पोलिसांचा निषेध व्यक्त केला.