परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित होणारे कार्य 

हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. मधुरा भोसले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून उत्पत्तीशी संबंधित धर्म आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित असणार्‍या नवीन ग्रंथांची निर्मिती होणे, स्थितीच्या अंतर्गत भीषण आपत्काळात विश्वातील विविध सात्त्विक जिवांचे रक्षण होऊन त्यांच्याकडून काळानुसार आवश्यक असणारे व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील धर्माचरण अन् साधना चालू असणे आणि लयाच्या कार्याच्या अंतर्गत त्यांचे पाताळ अन् नरक येथील मोठ्या वाईट शक्ती नाहीशा होणे, सूक्ष्म युद्ध होऊन मोठ्या वाईट शक्तींचा संहार होणे, अशी कार्ये होत असणे अन् होणार असणे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही प्रकारची कार्ये पृथ्वीवर सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर धर्मसंस्थापना म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करण्याच्या अवतारी कार्यांतर्गत होत आहेत.’ – कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक